Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव; ६० लाख 3 हजाराच्या सोन्याच्या मोदकाला सर्वाधिक बोली | पुढारी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव; ६० लाख 3 हजाराच्या सोन्याच्या मोदकाला सर्वाधिक बोली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या सोन्या – चांदीच्या दागिन्यांचा लिलाव गुरुवारी संध्याकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत झाला. या लिलावात सोन्याच्या सव्वा किलोच्या मोदकासाठी साठ लाख, तीन हजार रूपयांची सर्वाधिक बोली ठरली. (Lalbaugcha Raja)

तर, साडेदहा लाख रुपयाचा  सोन्याचा हार देखील विक्रीस गेला. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी भाविक गर्दी करत असतात. यावेळी काही भाविक आपली मनोकामना राजाने पूर्ण करावी यासाठी नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यामुळे अनेकांनी सोना चांदीच्या लहान गणेश मूर्ती, मूषक, घर, मुकुट, कंठी, सोन्याची चैन यासारख्या भेटवस्तू राजाला अर्पण केल्या होत्या. या दागिन्यांचा नंतर लालबाग राजा मंडळ लिलाव करते. (Lalbaugcha Raja)

दरम्यान, या लिलावामध्ये 200 जणांनी सहभाग घेतला होता. ६० लाख 3 हजार रुपये किमतीचा सव्वा किलो सोन्याचा मोदक आणि साडेदहा लाख रुपये किमतीच्या सोन्याचा हार याच्यावर सर्वाधिक बोली लावण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिलावास गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

हेही वाचा;

Back to top button