Ganeshotsav 2022 : कोलकात्यातील १०८ स्वरूपातील उंदीरमामांसोबतची आकर्षक गणेश मुर्ती | पुढारी

Ganeshotsav 2022 : कोलकात्यातील १०८ स्वरूपातील उंदीरमामांसोबतची आकर्षक गणेश मुर्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोलकाता येथील गणपती भक्त मंडळ गेली १० वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहे. भवानीपोर परिसरातील राखल मुखर्जी रोड येथे हे मंडळ आहे. गोपी ठक्कर हे या मंडळाचे सेक्रेटरी आहेत. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक हे मंडळ आहे. दरवर्षी हे मंडळ आकर्षक अशा गणेशाच्या मुर्तींची स्थापना करते. 2018 मध्ये यांनी मुंबईतून कृणाल पाटील यांनी बनवलेली मूर्ती आणली होती.

कशी आहे कोलकत्ता येथील ही आकर्षक मुर्ती ?

गणपतीच्या मुर्तीजवळ १०८ उंदीर असलेली आकर्षक अशी ही यंदाची या मंडळाची मुर्ती आहे. गणपतीला १०८ नावांनी ओळखलं जातं त्याप्रमाणे १०८ रूपे आहेत. त्यानूसार यंदाची ही आकर्षक अशी १०८ वाहन असलेली म्हणजेच १०८ उंदिरमामांसोबतची मुर्ती पहायला मिळत आहे.

हेही वाचा

Back to top button