‘Cool mom’ उर्मिला निंबाळकरने शेअर केले सुपरफिट लूक्स | पुढारी

‘Cool mom’ उर्मिला निंबाळकरने शेअर केले सुपरफिट लूक्स

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अभिनेत्री, युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर हटके पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. क्युट लूक्स असलेली ही अभिनेत्री अलीकडेच आई बनली आहे. आपला गर्भवस्थेतील अनुभव अनेकदा व्हीडियोच्या माध्यमातून तिने चाहत्यांशी शेअर केला आहे. लाईफस्टाईल, फॅशन, मदरहुड, ट्रॅवल या टिप्स ती चाहत्यांशी शेअर करत असते. तर कधी कधी सोशल मीडियावर ट्रोल करणार्यांंना खरमरीत शब्दात उत्तर देताना दिसते.

लाईफस्टाईल, फॅशन, मदरहुड, ट्रॅवल याविषयी उत्तम माहिती देणारे मराठीत बनवत असल्याने तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अलीकडेच उर्मिलाने व्हिडियोच्या माध्यमातून तिचा पोस्टपार्टम अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे. पण सध्या चर्चा आहे ती तिच्या लूक्सची. पोस्टपार्टम वेट लॉसबाबत पोस्ट शेअर करत उर्मिलाने स्टायलिश फोटोही शेअर केले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘फक्त वजन पुर्वपदावर आलंय.
उर्मिला मात्र संपुर्ण बदलून गेलीय.
‘आई होणं म्हणजे स्त्रीचा नविन जन्म होणं’,
असं का म्हणतात, याची उकल फक्त आई झाल्यावरच होते. तोपर्यंत मजेशीर गोष्ट म्हणजे,
अथांग आणि मला एकाच वेळी दात येतायत.

अथांगचे दूधाचे दात तर माझी अक्कल दाढ.
आई झाल्यावर लईच अक्कल लावावी लागते,
तीही दिलीय आता देवाने’
यावेळी उर्मिलाने शेअर केलेल्या लूक्सचं चाहतेही कौतुक करत आहेत.

Back to top button