औरंगाबाद : पैठण येथील नाथसागर धरणातून पुन्हा विसर्ग वाढविला | पुढारी

औरंगाबाद : पैठण येथील नाथसागर धरणातून पुन्हा विसर्ग वाढविला

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाच्या वरील भागातून शुक्रवारी (दि.२) दुपारी ३.३० च्या दरम्यान पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे ४ फूट उघडलेल्या धरणाच्या १८ दरवाजातून गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या एकूण ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. नाथसागर धरणातून गोदावरी नदीत टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू असताना दुपारी ३.३० वाजता पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गोदावरी नदी एकूण ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, सायंकाळी येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन गोदावरी नदीचा विसर्ग कमी अधिक वाढ करण्याची शक्यता कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले. गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या विसर्गासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिलेल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button