वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | पुढारी

वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : वादग्रस्त ट्विट प्रकरणी अभिनेता कमाल रशीद खान याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर केले करण्यात आले. त्याला बोरिवली न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कमाल खानने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सायंकाळी ४ वाजता सुनावणी होणार आहे.

अभिनेता आणि समीक्षक असलेला केआरके म्हणजेच कमाल खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याआधी त्याने क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या निशाणा साधत वादग्रस्त ट्विट केले होते. बॉलिवूड चित्रपटांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरुन तो नेहमी चर्चेत असतो. केआरके याने नुकतेच ट्विटर हँडलवरील नाव बदलून कमाल राशिद कुमार असे केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये KRK विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. केआरकेने अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्याने अनेक प्रोजेक्ट्सची निर्मितीही केली आहे. तो बिग बॉसचाही भाग राहिला होता. बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने KRK वर मानहानीचा खटला दाखल केला होता. केआरकेने सलमान खानच्या राधे चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण केले होते. यामुळे सलमानने केआरके विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला होता.

हे ही वाचा :

Back to top button