मिका सिंगच्या ‘केआरके कुत्ता’ गाण्याने घातला धुमाकूळ (video) | पुढारी

मिका सिंगच्या ‘केआरके कुत्ता’ गाण्याने घातला धुमाकूळ (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन :स्‍वयंघाेषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान (केकेआर) आणि गायक मिका सिंग यांच्यातील वाद आता नव्‍या वळणावर येवून ठेपला आहे. गेल्या काही दिवसांत दोघांनी एकमेंकावर जोरदार टीका केली होती. याच दरम्यान मिका सिंगने केआरकेची खिल्ली उडवण्यासाठी ‘केआरके कुत्ता’ असे गाणे लॉन्च केले आहे. याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

मिका सिंगने हे गाणे एका दिवसांपूर्वी आपल्या यु ट्यूब  चॅनेलवर लाँच केले. हे गाणे स्वतः मिका सिंग याने गायिले. त्‍याला शारीब तोषी याचे सहकार्य मिळाले आहे. मिका सिंग यांनी या गाण्यात लाेकांचा समावेश करून घेतला आहे. 

वाचा : संजिदाच्या हॉट फोटोंचं कलेक्शन, सेक्सी फोटो पाहून नेटकरी म्हणाले… (Photos)

हे प्रकरण काय आहे?

केआरके हा चित्रपटाचे समीक्षण करताना अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्यात डोकावत असताे. यामुळे काही कलाकारांना या गोष्टीचा राग येत असे. असाच प्रकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत घडला. त्यामुळे सलमानने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला मिका सिंगने खुलेआम पाठिंबा दिला होता. मात्र, मिका सिंगने दिलेला पाठिंबा केआरकेला आवडला नसल्याने त्याने सलमानचा हा पाळीव कुत्रा अशा शब्दात खिल्ली उडवली होती. यामुळे मिका सिंग खूपच भडकला आणि त्याने ‘केआरके कुत्ता’ गाणे लॉन्च केले.  

वाचा : माझ्या आईने ‘तिला’ दाजीसोबत रंगेहाथ पकडले होते! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा सनसनाटी खुलासा 

‘केआरके’ने हे गाणे लॉन्च करून दाखवच, अशा इशारा मिका सिंगला दिला हाेता. याबाबत केआरकेने एक टविट करत हिंमत असेल तर गाणे लॉन्च करुन दाखवच, मग तुला बघतो. असे म्हटले हाेते. केआरकेचे हे आव्हान स्विकारून मिकाने ‘केआरके कुत्ता’ हे गाणे रिलीज केले. या गाण्याला काही तासांत २५ हजारांहून अधिक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

(video : Mika Singh youtube वरून साभार)

Back to top button