Malaika Arora : मलायकाची पांढऱ्या लहेंग्यात लाईमलाईटमध्ये पोज | पुढारी

Malaika Arora : मलायकाची पांढऱ्या लहेंग्यात लाईमलाईटमध्ये पोज

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर मलायका अरोराचे (Malaika Arora) अनेकदा जबरदस्त फोटो असतात आणि पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे. तिने पांढऱ्या लेहेंग्यात शेअर केलेले फोटोज चर्चेत आहेत. मलायका अरोरा हिची गणना बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. बॉलीवूडच्या सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये तिची गणना का केली जाते हे देखील मलायका वेळोवेळी सिद्ध केले आहे. ४८ वर्षीय मलायकाचा केवळ चेहराच नाही तर तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्सवरून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. सोशल मीडियावर अनेकदा मलायकाचे जबरदस्त फोटोज पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे. तिने पांढऱ्या लेहेंग्यात शेअर केलेले फोटोज चर्चेत आहेत. (malaika arora)

डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या प्री-वेडिंग पार्टीत मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. मलायकाच्या फोटोंवरून हे स्पष्ट होते की, लाईमलाईटमध्ये येण्यासाठी काय काय केले पाहिजे, हे तिला चांगले ठाऊक आहे.

मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला हा लेहेंगा परिधान करून मलायकाने एकापेक्षा एक पोझ दिली. सुंदर फोटोंमध्ये, मलायका स्टायलिश चोली आणि फुल स्लीव्हज लेहेंग्यात दिसत आहे.

विशेष म्हणजे तिने यावर दुपट्टा घेतलेला नाही. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने हिरवा चोकर आणि पांढरा राणीचा हार आणि सोबत हिरव्या रंगाची अंगठीही घातली होती. पण, तिने ईअरिंग्ज घातलेले दिसत नाहीत.

मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या लहेंग्यात आणि मोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मलायका साध्या पण आकर्षक लूकमध्ये खरोखरच सुंदर दिसते. तिच्या या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Back to top button