

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनच्या २० वर्षीय मेलिसा रौफ (melissa rauf ) ही मिस इंग्लंड स्पर्धेच्या ९४ वर्षांच्या इतिहासात मेकअपशिवाय उतरणारी पहिली व्यक्ती ठरली आहे. लंडनमधील उपांत्य फेरीत मेकअपशिवाय दिसलेली मेलिसाने अंतिम फेरी गाठली आहे. ती पुढे म्हणाली, "मी कोण आहे हे दाखवायला मी घाबरत नाही…मेलिसा खरोखर कोण आहे हे दाखवून द्यायचे आहे." (melissa rauf )
कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत आपण मेकअपशिवाय विचार करूच शकत नाही. विना मेकअपचे या स्पर्धेत उतरणे हे मुर्खपणाचे ठरेल. अनेक सौंदर्यवती आपला वेगवेगला मेकअप करून स्पर्धेत उतरतात. विविध देशांतून होणाऱ्या स्पर्धा असो वा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स. प्रत्येक सौंदर्य स्पर्धेत भारी-भरकम मेकअप चेहऱ्यावर लावले जाते. पण आता इंग्लंडच्या एक तरुणीने इतिहास रचला आहे
२० वर्षीय तरुणी मेलिसा रौफ इंग्लंडच्या सौंदर्य स्पर्धेत उपांत्य फेरीत विना मेकअप आली. तिच्या या निर्णयाने अनेकांवर प्रभाव पडला. तिला अंतिम फेरीत निवडले गेले. मेलिसाने न्यॅचुरल ब्युटी प्रमोट करत अंतिम फेरीत आपले स्थान मिळवले. मेलिसाने बेयर फेस राऊंडदेखील जिंकले. यामध्ये स्पर्धकांनी नो फिल्टर-मेकअपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
मेलिसा नेहमीच मेकअपपासून दूर राहत नव्हती. पण, ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तिने मेकअपपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
याविषयी मेलिसा म्हणते, ती जगातील सौंदर्याच्या अनेक मापदंडावर खरी उतरते. लेकिन तिने स्वत:ला जशी आहे तशी स्वीकार करणे शिकले आहे.