Nude Photoshoot : ‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंहची पोलिसांकडून झाडाझडती

Nude Photoshoot : ‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंहची पोलिसांकडून झाडाझडती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nude Photoshoot : 'न्यूड फोटोशूट' प्रकरणी रणवीर सिंहची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी रणवीरची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. मुंबई पोलिस याप्रकरणी तब्बल दोन तास चौकशी करत होते.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. तो कोणत्या चित्रपटासाठी नाही तर त्याने केलेल्या न्यूड फोटोशूट प्रकरणी सध्या तो सर्वत्र चर्चेत आहे. याबाबत त्याला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले तर अनेकांनी त्याची बाजू उचलून धरली. तर याप्रकरणी रणवीर नाराज असलेल्यांनी अनेक ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या. Nude Photoshoot  न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एका मॅगझीनसाठी केलेल्या हे Nude Photoshoot  न्यूड फोटोशूट प्रकरण रणवीरच्या चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली. चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्याला 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने मुदत वाढवून मागितली. त्यानंतज आज तो चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिला.

Nude Photoshoot न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याची चेंबूर पोलीस ठाण्यात आज दोन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, चौकशीतील मुद्दे अजून समोर आलेले नाही. चौकशीत काय झाले हे उघड झालेले नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news