नागपूर कारागृहात ‘स्वाईन फ्लू’ने कैद्याचा मृत्यू | पुढारी

नागपूर कारागृहात ‘स्वाईन फ्लू’ने कैद्याचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पांडू नरोटी (वय ३४) या कैद्याचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला. खोकला, ताप, दम लागणे अशी लक्षणे दिसून आल्याने त्याला २० ऑगस्ट रोजी दुपारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर वार्ड क्र. २५ मध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, २१ तारखेला त्याला स्वाईन फ्लू ची लागण झाल्याचा अहवाल आला. गुरूवारी (दि. २५) त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

 

Back to top button