Leopard : बिबट्याने केली श्वानाची शिकार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर | पुढारी

Leopard : बिबट्याने केली श्वानाची शिकार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसापासून अमरावती शहरातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो आहे. आता पुन्हा भानखेळा मार्गावरील कवरधाम परिसरात बिबट्याने एका श्वानाची शिकार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हे सीसीटीव्ही फुटेज १९ मेच्या मध्यरात्री १.२२ मिनिटाच्या दरम्यानचे आहे. बिबट्याने एका श्वानाची शिकार केल्यानंतर दुसरा श्वान त्याच्यामागे धावत आहे. मात्र, तरीही बिबट्या केलेली शिकार घेऊन जंगलाच्या दिशेने निघून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हा सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी २४ मे रोजी समोर आला.

वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे बिबट्यासारखे प्राणी शहरातील मानवी वस्तीकडे येत आहे. त्यामुळे भानखेडा परिसरातील वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात वाढता मानवी हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीच छत्री तलाव परिसरात बर्थडे पार्टी साजरी करत असताना तेथे बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे शहरातील काही भागात बिबट्या प्रवेश करत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा 

Back to top button