पहिल्या टप्प्यात 5G सुरू होणाऱ्या १३ शहरांमध्‍ये पुणे आणि मुंबई | पुढारी

पहिल्या टप्प्यात 5G सुरू होणाऱ्या १३ शहरांमध्‍ये पुणे आणि मुंबई

पहिल्या टप्प्यात 5G सुरू होणाऱ्या १३ शहरांत पुणे आणि मुंबई

मुंबई : पुढारी ऑनलाईन : भारतात लवकरच 5 G मोबाईल सेवा सुरू होत आहे. यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा ही सेवा लवकरच सुरू होत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार २९ सप्टेंबरला इंडियन मोवाईल काँग्रेसमध्ये ५ जी सेवेचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्याच आठवड्यात मोबाईल कंपन्यांना ५ जी सेवा लाँच करण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचना केल्या होत्या. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात भारतात काही टप्प्यांत ही सेवा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात १३ शहरांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे. तसेच अहमदाबाद, बंगळूरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकता, लखनऊ या शहरांचाही यामध्‍ये समावेश आहे.

अर्थात या शहरांतील काही निवडक भागांतच सुरुवातीला ५ जी सेवा सुरू होईल. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, आदानी डेटा नेटवर्कस, व्होडाफोन या कंपन्यांना ५ जीचा परवाना मिळालेला आहे. जिओ आणि एअरटेल यांच्यात ५ जी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तीव्र स्‍पर्धा आहे.

हेही वाचा

Back to top button