5G in India : भारतात केव्‍हा सुरु होणार 5G मोबाईल सेवा : जाणून घ्‍या 1G ते 5Gपर्यंतचा प्रवास | पुढारी

5G in India : भारतात केव्‍हा सुरु होणार 5G मोबाईल सेवा : जाणून घ्‍या 1G ते 5Gपर्यंतचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
देशात 5G सेवाची चाचणी ( 5G in India ) १९ मे रोजी दूरसंचार मंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांनी आयआयटी मद्रासमध्‍ये केली. यावेळी त्‍यांनी ऑडिओसह व्‍हिडीओ कॉलही केला. यापूर्वी १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात पहिला 5G टेस्‍टबेड लॉन्‍च केला होता. याचचेळी पंतप्रधान मोदी यांनी या दशकाच्‍या शेवटी 6G सेवा सुरु करण्‍याचे लक्ष्‍य असल्‍याचे घोषणाही केली होती. टेलीकॉम क्षेत्रातील 1G ते 5Gपर्यंतचा प्रवासात खूप मोठे बदल झाले आहेत. प्रत्‍येक टप्‍प्‍यातील बदलामुळे आपल्‍या जीवनातही बदल झाले आहे. जाणून घेवूया दूरसंचार क्षेत्रातील 1G ते 5Gपर्यंतचा प्रवासात झालेले बदलांविषयी…

1G व्‍हाईस कॉलचे

जगात 1G मोबाईल फोन सेवेची सुरुवात १९७० मध्‍ये जपानमध्‍ये झाली. यानंतर अन्‍य विकसित देशात ही सेवा सुरु झाली. मोबाईल टेलीकम्‍युनिकेशन टेक्‍नॉलॉजीची ही पहिली पिढी. यामध्‍ये केवळ व्‍हाईस कॉलच होता. मात्र फोनवरुन येणार्‍या आवाजाची गुणवत्ता बहुच निम्‍न दर्जाची होती. तसेच रोमिंग सुविधाही नव्‍हती. तब्‍बल दोन दशक 1G ने सेवा दिला. यानंतर १९९१ नंतर 2G ला प्रारंभ झाला.

2G पूर्णपणे डिजिटल; पण फोकस व्‍हाईस कॉलवरच

2G पूर्णपणे डिजिटल होते. CDAM आणि GSM व्‍यवस्‍था या जनरेशनमध्‍ये आली .तसेच मोबाईल फोनवर ग्राहकांना रोमिंग सुविधाही उपलब्‍ध झाली. मात्र त्‍या काळात रोमिंगची दर प्रचंड होते. याचवेळी ग्राहकांना व्‍हाईस कॉलबरोबरच एसएमएस आणि एमएमएस सेवाही अशी डाटा सेवा सुरु झाली. याच सर्वाधिक स्‍पीड हा 50 kbps होता. 2Gचा फोकस हा व्‍हाईस कॉलिंगवरच होता. याच काळात डेटा वापरण्‍यासही सुरुवात झाली. विशेष म्‍हणजे आजही भारतात 2G फोनचा वापर करणारे वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्‍यामुळे देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी जियो हिने मागील वर्षी ‘2Gमुक्‍त भारत’ करण्‍याचे आमचे लक्ष्‍य असल्‍याची घोषणा केली होती.

3G मुळे नेमके काय बदल झाले ?

2001 मध्‍ये देशात 3G सेवेला प्रारंभ झाला. वास्‍तविक ही सेवा भारतात येण्‍यास खूपच विलंब झाला. 2G च्‍या तुलनेत या सेवेत चारपट इंटरनेट स्‍पीड असेल, असा वादा केला गेला. मोबाईल फोनच्‍या या जनरेशनमध्‍ये व्‍हिडीओ कॉलिंग, वेब ब्राउजिंग, ईमेल, नेविगेशनल मॅप आणि संगीत आदी सुविधा मोबाईल फोनवर दिल्‍या गेल्‍या. याच काळ जगभरात ब्‍लॅकबेरी फोन प्रचंड लोकप्रिय झाला. २००८ मध्‍ये ॲपलने 3G मोबाईल फोन बाजारात आणला. भारतात २००८ मध्‍ये 3G सेवा देणारे मोबाईल फोन आणि डाटा सेवा सुरु झाली. सर्वप्रथम दिल्‍ली आणि मुंबईत एमटीएनएलने ही सेवा सुरु केली. भारतात 3G सेवा देणारी एमटीएनएल पहिली दूरसंचार कंपनी ठरली. फेब्रुवारी २००९मध्‍ये बीएसएनएलने चेन्‍नई आणि कोलकातामध्‍ये ही सेवा सुरु केली. यानंतर टप्‍याटप्‍याने देशभरात ही सेवा सुरु झाली. सप्‍टेंबर २०१० मध्‍ये खासगी मोबाईल सेवा देणार्‍या प्रोव्‍हाडर्संना 3G स्‍पेक्‍ट्रमचे वाटप झाले.

4G मध्‍ये स्‍मार्ट फोन झाला संगणक

२०१० मध्‍ये भारतात 3G सेवा सुरु झाली. मात्र तोपर्यंत जगातील अनेक देशांमध्‍ये 4G सेवेला प्रारंभ झाला होता. या सेवेत 3Gच्‍या तुलनेत पाच ते सात पट अधिक इंटरनेट स्‍पीड मिळू लागले. यामुळे स्‍मार्ट फोन हाच संगणकासारखं काम करु लागला. भारतात २०१२ मध्‍ये सर्वप्रथम एअरटेल कंपनीने 4G डाटा सेवा देण्‍यास सुरुवात केली. यानंतर २०१४ मध्‍ये एअरटेल आणि ॲपल कंपनीने संयुक्‍तपणे मोबाईल फोनवर 4G सेवा देण्‍यास प्रारंभ केला. या सेवेचा झपाट्याने प्रसार झाला. २०१६ मध्‍ये 4G सेवा भारतात केवळ १२ टक्‍के वापरत होती. पाच वर्षांनंतर म्‍हणजे २०२१ च्‍या अखेरपर्यंत ही सेवा देशभरात ७७ टक्‍के हून अधिक ग्राहकांपर्यंत पोहचली. २०१६ मध्‍ये देशातील महानगरात केवळ २२ टक्‍के 4G सेवा असणारे फोन होते. आता ही टक्‍केवारी ८३वर पोहचली आहे.

5G in India : 5G मुळे काय बदलणार ?

4G सेवेमध्‍ये ग्राहकांना डाटा ट्रान्‍सफरला काही वेळ लागतो. यासेवेत डाटा ट्रान्‍सफर होण्‍यास ५० मिलीसेंकद लागत असतील तर 5G मध्‍ये यासाठी केवळ १ मिलीसेंकद लागेल, असा दावा केला जात आहे. 5G सेवेमध्‍ये मोबाईल फोनची बॅटरीचे आयुष्‍यही वाढेल कारण या सेवेत डाटा ट्रान्‍सफर हेण्‍यास कमी उर्जा लागते. डाउनलोडचे स्‍पीड वाढेल. तसेच सेल्‍फ ड्रायव्‍हिंग कार, रोबोटिक सर्जरी, स्‍मार्ट सिटी बांधणी अशा क्षेत्रातही 5G सेवेचे मोठे योगदान असेल, असे मानले जात आहे.

5G in India : भारतात केव्‍हा सुरु होणार ?

सध्‍या अमेरिका, दक्षिण कोरिया आणि कॅनडा या देशांमध्‍ये 5G सेवा सुरु झाली आहे. केंद्र सरकार या वर्षाच्‍या अखेरपर्यंत 5G स्‍पेक्‍ट्रमाचा लीलाव करेल, यानंतर वर्षाच्‍या अखेरीस ही सेवा भारतात सुरु होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button