देशाने 5G-6G तंत्रज्ञानाकडे वेगाने पाऊले उचलली : नरेंद्र मोदी | पुढारी

देशाने 5G-6G तंत्रज्ञानाकडे वेगाने पाऊले उचलली : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : “5G रुपाने आपला देश 5G Satndard बनविण्यात आला आहे, ही बाब देशाच्या अभिमानाची आहे. ही बाब देशातील गावांना 5G तंत्रज्ञान पोहोचण्यात मोठी भूमिका निभावणार आहे. 5G तंत्रज्ञानाने देशाच्या सरकारमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. शेती, आरोग्य, शिक्षण, इन्फास्ट्रक्चर क्षेत्रांमध्ये विकासाला चालना मिळेल. त्यातून सुविधा वाढतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील”, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार निमायक प्राधिकरण (TRAI) रौप्य महोत्सवनिमित्त व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली असलेल्या ८ संस्थांद्वारे विकसित केलेल्या 5G टेस्ट बेडचे उद्घाटन केले. ते म्हणाले, “आत्मनिर्भरता आणि निरोगी स्पर्धा समाजाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकते. त्यातील महत्वाचे उदाहरण म्हणजे टेलिकाॅम सेक्टर आहे. 2G काळातील निराशा, भ्रष्टाचार, पाॅलिसी पॅरालिसिसमधून बाहेर पडून देश 3G ते 4G आणि 5G-6G च्या दिशेने पाऊल उचलले आहेत.”

यापूर्वी प्रेस नोट सांगण्यात आले होते की, “या प्रकल्पात भाग घेणारे इतर संस्थांमध्ये IIT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT बाम्बे, IIT कानपुर, IISc बैंगलोर, सोसाइटी फार एप्लाइड माइक्रोवेव इलेक्ट्राॅनिक्स इंजीनियरिंग अण्ड रिसर्च (SAMEER) और सेंटर आफ एक्सिलेन्स इन वायरलेस टेक्नोलाजी (CEWiT) सहभागी आहेत. २० करोड रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.” 5G टेस्ट बेड भारतीय उद्योग आणि स्टार्टअपसाठी खूप मदत करेल, असेही त्यामध्ये सांगण्यात आले.

पहा व्हिडीओ : जंगलातील पाणवठ्यावरील एक संध्याकाळ

Back to top button