Rada movie : ॲक्शनपट ‘राडा’ला मिळालाय साऊथ स्टाईलचा तडका | पुढारी

Rada movie : ॲक्शनपट 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईलचा तडका

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टाईल कमालीची ॲक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा हँडसम हंक ‘राडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फुल्ल ऑफ ॲक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. सोबत या चित्रपटाचा हिरो ‘समा’ म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार ‘राडा’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टर आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपटाची उत्सुकता वेधून घेत आहे. साऊथ लूकचा टच घेत आकाश पहिल्यांदाच ॲक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’चे पोस्टर पाहता ते एकदम रफ अँड टफ आहे. रुबाबदार आणि डॅशिंग शरीरयष्टी असलेला एक हँडसम हंक दिसत आहे. त्याचा समोर आलेल्या वादळांना आणि संकटाना तो सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे त्याच्या शैलीवरून दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील क्रोधाच्या खुणा या कोणाला तरी योग्य तो न्याय देण्याच्या असल्याचे जाणवत आहे.

आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्याचा हा राग नेमका कोणाला धडा शिकवण्यासाठी आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा हा ॲक्शनपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस आणणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश सोपान नरवाडे यांनी केले आहे. संगीत दिनेश अर्जुना यांची आहे. एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली आहे. गाण्याचे बोल जाफर सागर यांनी लिहिले आहे. त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. येत्या २३ सप्टेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेदेखील वाचा- 

Back to top button