खराळवाडी बसशेडची दुरवस्था | पुढारी

खराळवाडी बसशेडची दुरवस्था

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील खराळवाडीतील पीएमपी बसशेडची दुरवस्था झाली आहे. शेडमध्ये आसनव्यवस्था उपलब्ध नाही. तसेच बाजूस गवत आणि रोपटी वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार होत आहे.

खराळवाडी येथे पीएमपीचे बसशेड थांब्यामध्ये आसण व्यवस्था नसल्याने नागरिकांना उभे राहून पीएमपीची वाट पाहावी लागते. अपुर्‍या जागेमुळे प्रवाशांना पावसामध्ये भिजत बसची वाट पहावी लागते; तसेच ज्येष्ठांनाही उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या शेडमध्ये आसनव्यवस्थेची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

Back to top button