परभणी : ‘सुनेगाव नदी पुलाच्या उंचीचा पडला विसर?’ | पुढारी

परभणी : 'सुनेगाव नदी पुलाच्या उंचीचा पडला विसर?'

गंगाखेड (परभणी); पुढारी वृत्तसेवा : स्वतःची राजकीय उंची वाढविण्याचा नादात परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांना तालुक्यातील सुनेगाव (सायाळा) येथील एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. मागील वर्षभरात चौथ्यांदा गोदावरी नदीवरील ८ गावांचा संपर्क तोडणाऱ्या सुनेगाव नदी पूलाच्या उंची वाढविण्याचा मात्र, विसर पडला आहे? अशी बोचरी टीका आपचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली आहे.

तालुक्यातील सुनेगाव (सायळा) इंद्रायणी नदीच्या पुलावरून या वर्षभरात चौथ्यांदा पाणी गेल्याने सातत्याने गोदाकाठावरील गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव, सायळा, धारखेड, मुळी, नागठाणा तर परभणी तालुक्यातील धसाडी, अंगलगाव, माळसोना या ८ गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे यांनी शनिवारी (दि.२०) रोजी सकाळी सुनेगाव (सायळा) नदी पुलावरची परिस्थिती पाहण्यासाठी भेट देऊन ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. या भेटी दरम्यान त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

वर्षभरात चौथ्यांदा गोदाकाठच्या ८ गावांचा संपर्क तुटल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजांच्या गोंधळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपचे सखाराम बोबडे व माजी सरपंच जयदेव मिसे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांवर स्वतःची राजकीय उंची वाढविण्याच्या नादात सुनेगाव (सायाळा) नदीपुलाची उंची वाढविण्याचा मात्र, त्यांना विसर पडला आहे? अशी बोचरी टीका केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button