मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत | पुढारी

मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेच्या पुणे मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान किमी 111 /45 अप लाईन वर मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या  सुमारास दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र मिडल लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्याने रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.

दरड कोसळण्याची माहिती समजताच पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर काही काळ थांबविण्यात आल्या होत्या. मात्र केवळ एकच लाईन दरडीमुळे प्रभावित झाल्याने रेल्वे वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

त्यांनतर युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचे काम सुरु करण्यात आले तर दरडीमुळे वाकलेला एक खांब देखील ठीक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8.40 च्या सुमारास ही अप लाईन रेल्वे वाहतूकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Back to top button