महाराष्ट्र दिनानिमित्त दादर परिसरातील वाहतुकीत बदल | पुढारी

महाराष्ट्र दिनानिमित्त दादर परिसरातील वाहतुकीत बदल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवार, 1 मे रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर परेड आयोजित केली जाते. या निमित्त दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक बदल केले आहेत. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतुकीत हे बदल असतील.

अ) वाहतुकीस प्रवेश बंद व एक दिशा मार्ग

एन. सी. केळकर मार्ग व एल. जे. रोड जंक्शन पासून (गडकरी जंक्शनपासून) केळूस्कर मार्ग, दक्षिण व उत्तर जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
केळूस्कर मार्ग दक्षिण, पूर्वेकडील वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील.
मीनाताई ठाकरे पुतळा येथून उजवे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर हा पश्चिमेकडे जाणार्‍या वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील.
एस. के. बोले रोड पोर्तुगिज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहील.

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्चत वाहतूकीस बंद राहील.
सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्र्यवीर सावकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणार्‍या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे राजा बढे चौक येथून पश्चिम उपनगराकडे जावे.

येस बँक जंक्शन येथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणारे वाहन चालक हे एस. व्ही. एस. रोडने येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क रोड नं. 5 म्हणजे पांडूरंग नाईक मार्गे राजा बढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने जातील.
नो-पार्किंग

केळूस्कर मार्ग दक्षिण व उत्तर
कर्नल दिलीप गुप्ते मार्गावर केळूस्कर मार्ग उत्तर पासून पांडूरंग नाईक मार्गापर्यंत.
पांडूरंग नाईक मार्ग, रोड नं. 5
एन. सी. केळकर मार्ग, गडकरी जंक्शन पासून कोतवाल गार्डनपर्यंत. 1 संत ज्ञानेश्वर मार्ग.

क) पोलीस, पी. डब्ल्यू. डी. आणि इतर शासकीय विभागाच्या वाहनांकरिता पार्किंग
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक. 2 वनिता समाज सभागृह.
महात्मा गांधी जलतरण तलाव.
कोहिनूर सार्वजनिक वाहन तळ, एन. सी. केळकर रोड, दादर (प.),

Back to top button