‘ईडी’ कारवाईच्या भीतीने कोणीही शिवसेनेत व भाजपकडे येऊ नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

'ईडी' कारवाईच्या भीतीने कोणीही शिवसेनेत व भाजपकडे येऊ नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ईडी’ कारवाईच्या भीतीने कोणीही शिवसेनेत व भाजपकडे येऊ नका, आम्हाला दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही. कोणीही हे पुण्याचं काम करू नका, असा टाेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लगावला. संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रीया देताना चौकशी होवू द्या, कर नाही त्याला डर कशाला, चौकशीनंतर सर्वकाही स्पष्ट होईल, असेही ते म्‍हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संपूर्ण मराठवाड्याची आढावा बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचं सरकारचे ध्येय आहे. मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. अतिवृष्टीमुळे ३०० ते ३२५ कोटींचे नुकसान झाले आहे. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करू तसेच औरंगाबादसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी  पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर नाही त्याला डर कशाला

संजय राऊतांच्या ईडी चौकशीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. त्यांना अटक होईल का याची माहीती नाही. कर नाही त्याला डर कशाला, चौकशी होऊ द्या त्यानंतर सर्व स्पष्ट होईल,असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगर याला राज्य शासनाकडून ३० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button