पुढारी ऑनलाइन डेस्क : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. २५ जुलैला नेपाळमध्ये ५.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, सकाळी ८ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप इतका तीव्र होता की, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे. अनेक लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोक सांगत आहेत.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक घरीच होते. अशातच सकाळी भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात जीवीत वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रविवारी सकाळी नेपाळची राजधानी काठमांडूच्या काही भागांना रिश्टर स्केलवर 5.5 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. काठमांडूच्या पूर्व-दक्षिण-पूर्वेस 147 किमी अंतरावर (स्थानिक वेळेनुसार) सकाळी 7:58 च्या सुमारास भूकंप झाला. एका ट्विटमध्ये, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे की, "तीव्रतेचा भूकंप: 5.5, 31-07-2022, 07:58:10 IST, अक्षांश: 27.14 आणि लांब: 86.67 रोजी झाला". शिवाय, अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा