मुख्यमंत्रीसाहेब, आरक्षण देणार का?; मराठा कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिले निवेदन | पुढारी

मुख्यमंत्रीसाहेब, आरक्षण देणार का?; मराठा कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिले निवेदन

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाला आरक्षण देणार का? असे निवेदन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, ही महत्त्वाची मागणी आहे, ही मागणी ४२ पेक्षा अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी रक्ताने लिहून मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

मुख्यमंत्री साहेब, मराठा समाजाला आरक्षण देणार का? असे निवेदनावर मजकूर लिहिला आहे. केंद्र सरकारने दिलेले ईडब्ल्यूएस आरक्षण संदर्भात कोर्टात निर्णय झाला आहे, त्यामुळे आता सुपरन्यूमरी पद्धत वापरून तत्काळ प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास येत्या अधिवेशनावर वाहनांचा लॉन्ग मार्च काढणार असल्याचेही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button