Rasik Dave : ‘क्योंकि सास भी..’ फेम केतकी दवे यांच्या पतीचे निधन

Ketki and Rasik Dave
Ketki and Rasik Dave
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी आणि बालिका वधू २ यासारख्या सुपरहिट मालिकेतील अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केतकी दवे यांचे पती रसिक दवे (Rasik Dave) दीर्घकाळ आजारी होते. ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. ६५ वर्षीय रसिक दवे मागील दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. (Rasik Dave)

रसिक दवे गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. गेल्या दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर होते आणि आठवड्यातून २-३ दिवस त्यांना रुग्णालयात जावे लागत होते. प्रकृती खालावल्याने काल रात्री त्यांचे निधन झाले.

रसिक आणि केतकी दवेही 'नच बलिये २' मध्ये एकत्र सहभागी झाले होते. रसिक यांनी अनेक गुजराती चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. रसिक आणि केतकी दवे यांनी गुजराती थिएटर कंपनीही चालवली. रसिकांना लोक प्रेमाने रसिक भाई या नावाने हाक मारायचे.

टीव्ही आणि गुजराती इंडस्ट्रीतही हे वृत्त ऐकल्यानंतर धक्का बसला आहे. रसिक 'संस्कार : धरोहर अपना की', 'ऐसी दिवांगी देखी नहीं' यांसारख्या मालिकांमध्येही दिसला आहे. केतकी दवेबद्दल सांगायचे तर त्या अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्येही दिसल्या आहेत.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news