काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरुण सावंतांचा शिंदे गटात प्रवेश | पुढारी

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरुण सावंतांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांसोबतच अनेक खासदार, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. यामध्ये आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरुण सावंत यांचाही समावेश झालाय. रविवारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.

अरुण सावंत यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली निवडणूक लढवली होती. सावंत यांनी काल शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज त्यांची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा :

Back to top button