पानीव : पुढारी वृत्तसेवा माळशिरस तालुक्यातील गिरझणी तलावाच्या धबधब्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या शुभम जठार रा.शंकरनगर (गवळीवस्ती) ता. माळशिरस या 18 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झालेची घटना रविवार दि.24 जुलै रोजी घडली आहे. सदर घटना अपघात की घातपात, याबाबत् अजुन स्पष्टीकरण झाले नसले तरी या घटनेमुळे सर्वेत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत् मिळालेल्या माहितीनुसार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शंकरनगर (स्वरुपनगर, गवळी वस्ती) येथे राहणारा मुलगा शुभम भारत जठार हा आपल्या मित्रांसोबत गिरझणी येथिल तलावाच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता.
धबधब्यात मित्रांसोबत मौज-मजा करत फोटो काढले. या दरम्यान शुभम व त्याच्या मित्राचा पाय घसरल्याने दोघेही धबधब्यवरुन घसरत धबधब्याच्या पायथ्याशी असणार्या डोहात पडले. तिथे उपस्थित इतराच्या लक्षात येताच त्यांनी डोहाकडे जावुन दोघांना बाहेर काढले. बाहेर काढल्यावर शुभमच्या हालचाली मंदावल्याचे जाणवल्याने त्याला उपचारासाठी हलवले. परंतु शुभमचा मृत्यु झाल्याचे समजले.घसरुन पाण्यात पडलेल्या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते, अशी माहीती नातेवाईकांन कडून मिळाली आहे.
या घटनेत मयत झालेला शुभम भारत जठार हा शंकरनगर येथिल महर्षी शंकरराव मोहीते प्रशालेत 12 वी चे शिक्षण घेत होता.तरुण वयातील मुलांच्या अकस्मीत मृत्यूमुळे परीवारावर दुख:चा डोगर कोसळला आहे. तर या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. नातेवाईक व मित्रांनी शुभमच्या मृत्युची खबर अकलूज पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी पंचनामा करुन पुढील कारवाई केली.