

नुकताच वस्तूसेवा करात काही बदल झाल्यामुळे कणिक, पनीर, दही, तूप, लोणी यांसारख्या सुट्या व बिगर ब्रँडेड वस्तूंवर नव्याने 5 टक्के वस्तू सेवाकर लावला जाईल. त्याचबरोबर रुग्णालयातील 5000 रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या खोल्यांसाठी नव्याने हा कर लावला जाईल. ऑस्टोमी प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी लागणार्या उपकरणांवरील वस्तूसेवा कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के इतका कमी होणार आहे. ट्रक्स व मालवाहू वाहने (ज्याच्या भाड्यामध्ये इंधनाची किंमतही अंतर्भूत असते). ही वाहने भाड्याने घेतल्यास, त्यावर 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के इतकी सवलत असेल. विमानाने इकॉनॉमी क्लासने ईशान्यकडील अरुणाचल, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि बागडोगर सीमा येथे प्रवास भाड्यावर वस्तू सेवाकर लावला जाणार नाही. बॅटरीसोबत विजेवर चालणार्या वाहनांवर 5 टक्के इतका हा कर लागेल.
सर्व प्रकारची शाई, कटिंग, ब्लेडसह मिळणारे चाकू, कागद कापण्याचे चाकू, पेन्सिल, शार्पनर, एलईडी दिवे, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य अशा वस्तूंवर 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के वस्तूसेवा कर लागेल.
रस्तेबांधणी, पूलबांधणी, रेल्वे, मेट्रो यासाठी दिले जाणारे कंत्राट, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र इत्यादींवर 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के वस्तूसेवा कर लागणार आहे.
रिझर्व्ह बँक, विमा नियामक व विकास प्राधिकरण आणि सेबी या नियामक संस्था देत असलेल्या सेवांवर 18 टक्के वस्तू सेवा कर लागणार आहे. या सर्व करवाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला जास्त कात्री लागेल.
डॉलर व रुपयाचे विनिमय दर आता वर चालले आहेत. डॉलर महाग होत आहे. त्याचा मोठा झटका आयात-निर्यातीवर आणि पर्यटन क्षेत्रांना बसेल. परदेशात जाताना डॉलरची जरूरी लागते. डॉलर महाग होईल, तसतसे विदेशी पर्यटन महाग होईल. भारतातून विदेशात शिक्षण घेणेही महाग होणार आहे.
रुपयाच्या घसरणीचा फटका सर्व प्रकारच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात बसेल. डॉलर महाग होत असल्याने आयातीवर विपरीत परिणाम होत असला तरी निर्यातदारांना त्याचा फायदा होईल.
मोबाईल हँडसेटसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, काही मोटारी यांचे आगामी काळात भाव वाढणार आहेत.
जून 2022 च्या पहिल्या तिमाहीचे कंपन्यांचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राला नव्या आर्थिक वर्षाच्या जून अखेरच्या पहिल्या तिमाहीत 452 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. अन्य बँकांचे जेव्हा जून अखेरच्या पहिल्या तिमाहीचे आकडे दिसू लागतील, त्यातही हाच ढीशपव स्पष्ट होईल. गतवर्षीच्या याच तिमाहीसाठी तिने (महाबँकेने) 208 कोटी रुपयांचा नक्त नफा दाखवला होता. त्यात यावेळी दुपटीपेक्षा जास्त वाढ दिसत आहे. यावर्षी बँकेच्या कर्जवितरणात 20 टक्क्यापेक्षा जास्त वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे हा शेअरही आपल्या भागभांडारात अवश्य हवा. जर या बँकेचे, येणार्या बातम्यांप्रमाणे निर्विवेशन (ऊळीळर्पींशीीांशपीं) झाले तर गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीतून खूप फायदा होईल. मात्र महाराष्ट्र बँकेचे भरणा झालेले भागभांडवल 4400 कोटी रुपयांच्या इतके असल्यामुळे तिचे तिमाही व वार्षिक शेअरगणिक उपार्जन खूप कमी पडते.
जून तिमाहीचे कंपन्यांच्या नक्त विक्री व नफ्याचे आकडे जसजसे प्रसिद्ध होतील तसतसे निर्देशांक आणखी बाळसे धरेल. भारतीय रुपयाचा विनिमय दर डॉलरच्या संदर्भात जास्त वाढला म्हणून शेअर बाजारात जास्त स्थिरता व द्रवता वाढली आहे.
डॉ. वसंत पटवर्धन