Mrunmayee Lagoo : रीमा लागू यांच्या मुलीला पाहिलं का?, थ्रोबॅक फोटोने धुमाकूळ | पुढारी

Mrunmayee Lagoo : रीमा लागू यांच्या मुलीला पाहिलं का?, थ्रोबॅक फोटोने धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रीमा लागू छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. परंतु, रीमा लागू याच्याप्रमाणे तिची मुलगी मृण्मयी लागू देखील काही कमी नाही. आईच्या पावलांवर पाउल ठेवत मृण्मयीने ( Mrunmayee Lagoo ) देखील अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. सध्या तिच्या थ्रोबॅक फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

रीमा लागूच्या मुलगी मृण्मयीने ( Mrunmayee Lagoo ) तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने आपले स्वत: चे केस स्वत: कापले असल्याचे सांगितले आहे. यात तिचे मोकळे केस आणि विना मेकअप लूक सुंदर दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘After baking my own bread, growing my own curry leaves and grinding my own coffee I have finally cut my own hair! Now I have to milk my own cow and fish my own fish 😄’ असे लिहिले आहे. मृण्मयीचा हा क्यूट फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘तू तुझ्या आईसारखी सुंदर दिसतेय’, ‘हूशार’, ‘Masha Allahh 😍😍😍’, ‘Awesome’, ‘झक्कास’, ‘Looking fresh, Haha 😜’, ‘wow’, ‘सादगी हो तो ऐसी’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. मृण्मयीचे रीमा लागू याच्यासोबतचे देखील काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हा फोटोला आतापर्यत्न ८०० जणांनी लाईक्स केले आहे.

रीमा लागू यांनी त्याच्या करिअरमध्ये ‘मैंने क्या किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘कल हो ना हो’, ‘साजन’, ‘पत्थर के फूल’, ‘हम साथ साथ हैं’, ‘दिलबर’, ‘येस बॉस’, ‘आरजू’, ‘किडनॅप’ या सुपरहिट चित्रपट गाजविले. तर मृण्मयीने पीके’ (२०१४), ‘दंगल’ (२०१६), ‘३ इडियट्स’ आणि ‘थप्पड’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. मृण्मयी तिच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

Back to top button