पुढारी ऑनलाईन डेस्क
आज १७ मे रोजी लोकप्रिय अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृतिदिन. बॉलिवूडमध्ये 'आई'ची भूमिका साकारून नेहमी आपली प्रतिमा उंचावणाऱ्या रीमा लागू यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली. १८ मे, २०१७ रोजी रीमा यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुआत मराठी चित्रपटातून केली होती. अनेक वर्षांपर्यंत त्यांनी मराठी थिएटरमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. रीमा यांनी 'हम साथ साथ हैं', 'कुछ कुछ होता है', 'मैंने प्यार किया', 'कल हो ना हो' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आठवणीतील भूमिका साकारल्या.
चित्रपटांशिवाय, रीमा लागू रिअल लाईफमध्येही एका मॉडर्न आईप्रमाणे राहिली आहे. चित्रपटांमध्ये काम करताना त्यांची भेट प्रसिध्द मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाले. काही वर्षांनंतर रीमा लागू आणि विवेक लागू यांच्याशी लग्नबंधनात अडकल्या. दोघांची एक मुलगी देखील आहे. तिचे नाव आहे-मृणमयी लागू.
लग्नानंतर काही कालावधीनंतर रीमा लागू आणि विवेक लागू यांच्यात वाद सुरू झाला. अखेर त्या आपल्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यांनी सिंगल मदर होऊन आपल्या मुलीचा सांभाळ केला.
आपल्या चार दशकाच्या करिअरमध्ये रीमा लागू यांनी आपली प्रतिमा आणखी उंचावली.
रिमा लागू यांनी घर तिघांचे हवे, तो एक क्षण , बुलंद , पुरुष , सविता दामोदर परांजपे, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, विठो रखुमाय, सासू माझी ढासू , शांतेच कार्ट चालू आहे , अशा अनेक नाटकातून त्यांनी अभिनय केला. 'सिंहासन', 'आक्रोश' आणि 'कलयुग' या चित्रपटापासून त्यांचा अभिनय आणखी खुलत गेला. त्यांनी ' रिहाई ' नावाच्या एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी 'कयामत से कयामत तक', 'मैने प्यार किया', ' हम आप के है कौन ', 'कल हो ना हो', 'वास्तव', 'जिस देश में गंगा रहता है' असे गाजलेले चित्रपट केले. अनेक चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत होत्या. 'वास्तव' चित्रपटातील त्यांची आईची भूमिका वेगळी ठरली होती. शूटिंगच्यावेळी या चित्रपटातील अभिनेता संजय दत्त हा फक्त त्यांच्यापेक्षा वयाने एक वर्ष मोठा होता.
१९८२ मध्ये रिलीज झालेला आपली माणसं या चित्रपटात त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत अभिनय केला. एक पत्नी कशी असावी, ती आपल्या पतीसाठी कशी मुलांशी लढते, याचे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले आहे. रिमा लागू यांनी केलेल्या संजय दत्त, शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांच्या आईच्या भूमिकाही गाजली.
रिमा लागू यांनी तूतू -मैमै , दो और दो पाच, धडकन, दो हंसो का जोडा, तुझं माझं जमेना, खानदान , श्रीमान श्रीमती , नामकरण अशा अनेक मालिकांतून कामे केली.