Hemangi Kavi : तमाशा लाईव्हवरून हेमांगीची पोस्ट चर्चेत; म्हणते… | पुढारी

Hemangi Kavi : तमाशा लाईव्हवरून हेमांगीची पोस्ट चर्चेत; म्हणते...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) या ना त्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह असते. म्हणूनचं सोशल मीडियावरील तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ती आपल्या चाहत्यांना वेगवेगळे अपडेट्स देत असते. आताही तिने आपल्या मनातील गोष्ट शेअर केली आहे. हेमांगीने फेसबूकवर पोस्ट लिहून ही गोष्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पहा- (Hemangi Kavi )

हेमांगी लिहिते-‘३५ हून अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं! हे भाग्य मला दिलं ते तमाशा Live ने. मला वाटतं हा प्रकार भारतीय सिनेमा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे (मी चूक असेन तर चूक सुधारावी ) कुठल्याही कलाकारासाठी एक biodata बनू शकेल किंवा एखाद्या कलाकाराच्या career मधल्या सगळ्या projects मधली सगळी characters मोजली तर ती ही कमी पडतील अशी वेगवेगळी characters मला या सिनेमात करायला मिळाली. ह्या सगळ्या पात्रांमध्ये फक्त दिसणं नाही तर भाषा, देहबोली, voice modulation, वयोगट, सामाजिक स्तर या सगळ्यात वेगळेपण underline केलं गेलं. आता Box office वर चित्रपट चालला नाही. ( जे आहे ते fact म्हणून पचवायला काहीच हरकत नसते) पण या इतक्या कमाल चित्रपटाचा एक महत्वाचा भाग मी झाले याचा मला कायम अभिमान राहील. असं फार कमी चित्रपटांबद्दल एक कलाकार बोलतो!

यासाठी सर्वात आधी मी आमचे दिग्दर्शक Sanjay S Jadhav यांची ऋणी राहीन त्यांनी मला ‘हा’ नाही ‘हे’ roles offer केले.

दुसरे आमचे सहाय्यक दिग्दर्शक Yogesh Phulphagar यांचे आभार ज्यांनी या सगळ्या भूमिका पार पाडण्यास मला खूप मदत केली.

तिसरी आमची वेशभुषाकार sayali soman जिने खूप कमी वेळात आम्ही character नुसार आयत्या वेळेला वाट्टेल ती मागणी करायचो costumes accessories ची आणि ती ते उपलब्ध करून द्यायची!

चौथी मी …. make up आणि hair styling माझं होतं so मला ही थोडी शाबासकी! Hehe ☺️

बाकी चित्रपट जेव्हा ott वर येईल तेव्हा नक्की पहा अशी मी अजूनही विनंती करेन कारण एका खूप चांगल्या विषयाचा सिनेमा आहे हा. बातम्या, राजकारण, trp ची चढाओढ, त्यात होरपळून निघणारे आपण सगळे, एका मुलीची, तिच्या बापाची, घरच्यांची गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी मोठ्या पडद्यावर miss केली. छोट्या पडदयावर मात्र miss करू नका!’

हेमांगीने पोस्टच्या शेवटी लिहिलंय- #तमाशाLive #TamashaLive

या पोस्टवरून हेमांगी तमाशा लाईव्ह या चित्रपटाचा एक भाग असणार आहे, हे समजते. तमाशा लाईव्ह या चित्रपटामध्ये अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.

Back to top button