Mali Times : ‘प्राजक्ता प्रभा’ झाले ‘माळी टाईम्स…’ हेडलाइन आहे शिंदे-ठाकरे एकत्र! | पुढारी

Mali Times : 'प्राजक्ता प्रभा' झाले 'माळी टाईम्स...' हेडलाइन आहे शिंदे-ठाकरे एकत्र!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री. पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. तिने साडीमध्ये हे खास फोटोशुट केले आहे. साडीवर इंग्रजी वाक्ये (Mali Times) पाहायला मिळत आहे. हे लेटेस्ट फोटोज तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट भरभरुन आणि हटके केल्या आहेत. 

Mali Times

Mali Times

प्राजक्त प्रभा झाले; आता माळी टाईम्स 

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे ती घराघरात पोहोचली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील  मेघना कुडाळकरच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. रानबाजार वेबसिरीजमधील भूमिकेमुळे ती अधिक चर्चेत आली. आता ती पुन्हा एकदा आपल्या हटके फोटोशुटमुळे ती चर्चेत आली आहे. तिने व्हाईट साडीमध्ये फोटोशुट केलेआहे. या साडीवर ब्लॅक कलरने इंग्लिशमध्ये वाक्य लिहली आहेत. या साडीवर तिने रेड कलरचा हटके ब्लाऊज घातला आहे. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर गंमतीशीर कॅप्शन देत शेअर केले आहे.

कमेंट्समधूनच घेतले कॅप्शन

प्राजक्ताने आपले हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत गंमतीशीर कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोंबरोबरच तिच्या या कॅप्शनची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तिने कॅप्शनमध्ये दिले आहे की, “आजच्या ठळक बातम्या- माळी टाईम्स🎯. (आजचं caption परवाच्या comments मधून ढापलेलं आहे 🤪. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव- मथळा मराठीत आहे 🎯).

Mali Times
Mali Times

Mali Times : कमेंटचा धुरळा

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा धुरळा उडवला आहे. असा पेपर रोज दहा वेळेस वाचला तरी कमी पडेल,  तरीच म्हटलं पेपर गेला कुठे, प्राजक्त प्रभा झाले आता माळी टाईम्स वाह क्या बात है प्राजू, हा पेपर टाका आमच्याकडे उद्यापासून, आज मी आवडीने पेपर वाचणार पूर्ण, पेपर वाचण्याची एवढी आवड आहे बाबा, सुरुवात कुठून करू, हे वृत्तपत्र आमच्या घरी तात्काळ सुरू करण्यात यावं, काय लूक, काय साडी, काय माळी न्यूज, सगळं कसं एकदम ok, आज माझा पेपरवाला चुकून दुसरीकडे गेलं वाटतं, बातम्यांच्या साडीला शब्दांच विरझन, लगा लगा नी मला बघा साठी अलिकडे कायपन, कोणती कोणती वर्तमान पत्र आहेत, काय शिंदे आणि ठाकरे एकत्र याची बातमी आली आहे काय अशा भन्नाट कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हेही वाचलंत का?

Back to top button