प्राजक्ता माळीचं लग्न ठरलंय का? गुगलवर युजर्स करताहेत सर्च | पुढारी

प्राजक्ता माळीचं लग्न ठरलंय का? गुगलवर युजर्स करताहेत सर्च

प्राजक्ताच्या लग्नाच्या चर्चांचा सर्च गुगलवर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सध्या रानबाजार या प्लॅनेट मराठीवरील वेबसेरिजमधील बोल्ड सिन्समुळे मोठी चर्चेत आहे. पण गंमत म्हणजे आज दिवसभरात प्राजक्ताचे लग्न ठरले, अशा काही पोस्ट सोशल मीडियावर काही युजर्सनी टाकल्या. त्यानंतर प्राजक्ताचे खरंच लग्न ठरलं आहे का, हा प्रश्न युजर्स गुगलवर सर्च करत होते.

त्यामुळे आज दिवसभरात Prajakta Mali Husband Name, Prajakta Mali Husband Photo हे दोन की वर्ड मोठ्या प्रमाणावर सर्च होत असल्याचे गुगल ट्रेंडसवर दिसत होते. या जोडीनेच युजर्स Prajkta Mali age, Parjkta Mali या कीवर्डने सर्च करत होते. यातही Prajkta Mali Husband हा सर्च २५० टक्क्यांनी वाढला होता.

पण प्राजक्ता माळीने स्वतःच सिंगल असल्याचा खुलासा एक वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. “मी सध्या सिंगलच असून २ वर्षं लग्न करण्याचा कोणताही विचार नाही,” असे तिने या मुलाखतीत म्हटलेलं आहे.

Prajakta Mali

अर्थात काही युजर्सनी फेसबुकवर तिच्या लग्नाबद्दल कमेंट केल्याने अनेकांचे मन दुखावणे सहाजिकच होते. अशांनी तातडीने गुगलचा आधार घेतल्याचे दिसते.

Back to top button