पतीचे नाव वापरून हॉटेलमध्ये बलात्कार
पुणे; पुढारी वृत्तसेवा: विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पतीच्या नावाचा वापर करुन लॉज रजिस्टरमध्ये रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर लॉजवर महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित पीडित महिलेने त्याच्याकडे इतर महिलांबरोबर असलेल्या संबंधांबाबत विचारणा केली असता तिला संशयित आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
नितीन ऊर्फ गणेश बाळासाहेब हेगडे (वय 35, रा. कागल, कोल्हापूर) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 36 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2012 ते जुलै 2022 दरम्यान घडला.