‘गुलछडी’चे भाव उतरले | पुढारी

‘गुलछडी’चे भाव उतरले

पुणे : पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने रविवारी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात गुलछडीच्या फुलांची आवक वाढली. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने भावात वीस टक्क्यांनी घसरण झाली. फुलबाजारात अन्य सर्व प्रकारच्या फुलांची आवक साधारण आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने बाजारात ओली फुले दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

पावसामुळे फुलांच्या दर्जात घसरण झाली असून भिजलेल्या फुलांचे प्रमाण वीस टक्क्यांवर आले आहे. ओल्या फुलांच्या तुलनेत सुक्या फुलांना मागणी चांगली आहे. मात्र, सध्या लग्नसराई, सणा-सुदीचा काळ नसल्याने फुलांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी, गत आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-30, गुलछडी : 10-20, अ‍ॅष्टर : जुडी 20-30, सुट्टा 100-150, कापरी : 20-40, शेवंती : 50-100, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-30, गुलछडी काडी : 20-60, डच गुलाब (20 नग) : 60-100, जर्बेरा : 20-40, कार्नेशियन : 60-100, शेवंती काडी 80-120, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 300-500, मोगरा 150-250.

हेही वाचा

ठाकरे सरकार अल्‍पमतात : एकनाथ शिंदे गटाचा सर्वोच्‍च न्‍यायालयात दावा

पौड : बेपत्ता ओमकारचा अद्याप शोध नाहीच

डाळिंब, सीताफळाला पावसाची प्रतीक्षा; फळांच्या दर्जात घसरण

Back to top button