पौड : बेपत्ता ओमकारचा अद्याप शोध नाहीच | पुढारी

पौड : बेपत्ता ओमकारचा अद्याप शोध नाहीच

पौड : मुळशी तालुक्यातील पिंपरी पॉइंट येथून बेपत्ता झालेल्या ओमकार विजय शेटे (वय 22, रा. खडकमाळ आळी, पुणे) याचा आठ दिवस शोध घेऊनही शोध लागेना. अंदरबन ट्रेकसाठी फिरायला जात असल्याचे सांगून ओमकार शनिवारी (दि. 18) सकाळी सात वाजता निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याचे वडील विजय शेटे यांनी तो बेपत्ता झाल्याबाबत पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओमकारची दुचाकी पिंपरी दरी पॉइंटजवळ पोलिसांना मिळून आली.

ओमकारचा शोध पौड, खडक पोलिस ठाणे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा, रायगड आपत्ती व्यवस्थापन भिरा तसेच वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ घेत आहेत. ओमकारचा गेले आठ दिवस पिंपरी सेल्फी पॉइंट, अंदरबनचे जंगल पार करून हिरडीपर्यंत शोध घेण्यात आला.

Back to top button