American Stock Market Collapse : अमेरिकन शेअर बाजारही कोसळला | पुढारी

American Stock Market Collapse : अमेरिकन शेअर बाजारही कोसळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे अर्थधोरण 15 जूनला जाहीर होणार आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात (American Stock Market Collapse) नकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून Dow, S&P 500 आणि Nasdaq ही तिन्ही इंडेक्स कोसळले आहेत. हे तिन्ही इंडेक्स सर्वसाधरण 2.5 टक्के इतक्या खाली आले आहेत.

FANMAG, सॉफ्टवेअर, रिटेल, बँक, रसायन, विमानसेवा आणि बायोटेक यांना मोठा फटका बसला आहे. तर तंबाखू, आरोग्य, खाद्यपदार्थ, चीनमधील तंत्रज्ञान कंपन्या यांनी त्यातल्या त्यात बरी कामगिरी केली आहे. (American Stock Market Collapse)

महागाई हा जगभरातील कळीचा मुद्दा बनला आहे. अमेरिकेतील कंझ्यमुर प्राईस इंडेक्स 8.6 टक्के इतका राहिला आहे. गेल्या चाळीस वर्षांतील ही सर्वांत जास्त महागाई राहिली आहे. फेड रेटमध्ये किमान 0.5 टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित मानले जात आहे

Back to top button