Crypto Crash : क्रिप्टोचा बाजार उठला; 18 महिन्यातील निच्चांक; रिकव्हरीसाठी लागतील 2 वर्षं | पुढारी

Crypto Crash : क्रिप्टोचा बाजार उठला; 18 महिन्यातील निच्चांक; रिकव्हरीसाठी लागतील 2 वर्षं

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Crypto Crash : आजच्या शेअर बाजारातील पडझडी बरोबरच क्रिप्टोकरन्सीने गुंतवणुकदारांना चांगलाच दणका दिला आहे. क्रिप्टोकरन्सीतील महत्त्वाचे चलन असलेल्या बिटकॉईनची आजची किंमत 24000 डॉलर इतकी घसरली आहे. ही किंमत गेल्या 18 महिन्यांतील सर्वांत कमी आहे. त्यामुळे बिटकॉईनचे एकूण बाजारमूल्य हे 457.12 अब्ज डॉलर इतके खाली आले आहे. त्यामुळे एकूण क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही कमी आले आहे.

इथिरियम या क्रिप्टोकरन्सीचे बाजारातील एकूण मूल्य हे 149.24 अब्ज डॉलर इतके खाली घसरले आहे. ही घसऱण 16.20 टक्के इतकी आहे. भारतात लाखो गुंतवणुकदार क्रिप्टोत गुंतवणूक करतात. पण एप्रिल महिन्यात सरकारने क्रिप्टोवर निर्बंध लावले. त्यामुळे क्रिप्टोमार्केटमध्ये एप्रिलपासूनच नरमाई आहे. (Crypto Crash) सध्या तरी गुंतवणुकादारांचा कल हा विक्रीकडे जास्त आहे, अशी माहिती Valud या कंपनीचे सीईओ दर्शन बठिजा यांनी सांगितले आहे.

अमेरिकेतील महागाईमुळे सर्वच बाजारांवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. 14 आणि 15 मार्चला अमेरिकेतील फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक आहे, त्यावर सध्या सर्वांच लक्ष आहे. जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत तरी फेडरलची भूमिका ही महागाई आटोक्यात ठेवण्यासाठीची असणार आहे.

क्रिप्टो मार्केटमध्ये रिकव्हरीसाठी किमान 12 ते 24 महिने लागतील, असा तज्ज्ञांता अंदाज आहे. काही गुंतवणुकदार पडलेल्या भावांचा लाभ घेऊन क्रिप्टोत गुंतवणूक करत आहेत, पण अनेक जण या अस्थिर स्थितीत मार्केटपासून दूर राहात आहेत. एकूण ट्रेडिंगचे व्हॉल्यूम जवळपास 90 टक्केंनी घटले असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. रिपल, कार्डानो, सोलान अशा इतर क्रिप्टो करन्सीचे भाव ही घसरले आहेत. (Crypto Crash)

Back to top button