Inflation : किरकोळ महागाई निर्देशांक 7.०4 टक्क्यांवर ; खाद्यपदार्थ आणि इंधन दरात नोंदवली घट | पुढारी

Inflation : किरकोळ महागाई निर्देशांक 7.०4 टक्क्यांवर ; खाद्यपदार्थ आणि इंधन दरात नोंदवली घट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरत्या मे महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) 7.04 टक्के इतका नोंदविला गेला आहे. तत्पूर्वीच्या म्हणजे एप्रिल महिन्यात हा निर्देशांक 7.79 टक्के इतका होता. थोडक्यात मे महिन्यात नागरिकांना महागाईपासून थोडाफार दिलासा मिळाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेली घट, पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दराची झळ लोकांना बसू नये यासाठी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेकडून महागाई आटोक्यात आणण्यासाठी योजले जात असलेले उपाय, यामुळे सीपीआय निर्देशांकात घट नोंदविण्यात आली असल्याचे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. हा निर्देशांक खाली आला असला तरी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मानकापेक्षा अजूनही जास्तच आहे. आरबीआयने महागाईची कमाल मर्यादा सहा टक्के इतकी निश्चित केली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात सीपीआय निर्देशांक 6.3 टक्के इतका होता.

हेही वाचा

Back to top button