जळगाव : कोदा शिवारात वीज पडून महिला ठार; मुलगा, सुन जखमी | पुढारी

जळगाव : कोदा शिवारात वीज पडून महिला ठार; मुलगा, सुन जखमी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कोदा येथील महिलेचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. गंगाबाई पांडुरंग जाधव असे संबंधीत महिलेचे नाव आहे. शनिवारी (दि.११ जून) दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील गंगाबाई पांडुरंग जाधव या कोदा येथे शेतात राहतात. शनिवारी दुपारी तीन वाजता पाऊस सूरु झाला. यावेळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ही महिला वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी बाहेर गेली. दरम्यान वीज महिलेच्या अंगावरच पडली. यामध्ये गंगाबाई या जागीच ठार झाल्या.

त्याचबरोबर मुलगा दत्ता जाधव व सून भारती जाधव हे दोघेजणही वीज अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. या दोघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button