ऊस तोडणी पैशांच्या कारणावरून मुकादमाने टोळी मालकालाच पळवून नेले | पुढारी

ऊस तोडणी पैशांच्या कारणावरून मुकादमाने टोळी मालकालाच पळवून नेले

खेड : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मुकादमाने टोळी मालकाला पळवून नेण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील एका गावात घडला. अपहरण झालेल्या या टोळी मालकाचा पोलिस निरीक्षकांनी शोध घेऊन त्याच्या कुटुंबाच्या सुखरूप ताब्यात दिले.

कर्जत तालुक्यातील गणेशवाडीतील टोळी मालक सुभाष बापू ठोंबरे (वय 41) व मुकादम आणि काही कामगार सोबत होते. अचानक ऊस तोडणी पैशांच्या कारणावरून मुकादम उपेंद्र दिलीप मोरे (रा.पिंपरखेड, ता. चाळीसगाव जि. जळगाव) याने चक्क टोळी मालकाला पळवून नेल्याची घटना 26 मे रोजी दुपारी घडली होती. अपहरण झालेल्या टोळी मालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात त्याच दिवशी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत: शिवसैनिकांची अडवणूक कराल तर याद राखा; शिवसेनाप्रमुख यादवांचा इशारा

कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सुभाष ठोंबरे हे सुरुवातीला नेवासा व नंतर पिंपरखेड (ता.चाळीसगाव) येथे असल्याची माहिती मिळाली होती. यादव यांनी स्थानिक पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मदतीने ठोंबरे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी पळून गेले. ठोंबरे यांना कर्जत येथे आणून नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात दिले. त्यामुळे ठोंबरे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहायक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलिस नाईक संभाजी वाबळे आदीनी केली.

Back to top button