निवडणुकांचे निकाल निराशाजनक आणि अनपेक्षित ः सोनिया गांधी  | पुढारी

निवडणुकांचे निकाल निराशाजनक आणि अनपेक्षित ः सोनिया गांधी 

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन

काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर निराशा व्यक्त केली आहे आणि हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे, असे सांगितले.  सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, “काॅंग्रेस वर्किंग कमिती लवकर यावर बैठक घेईल आणि निवडणुकांवर आत्मपरिक्षण करेल. त्याचबरोबर आम्हाला आमच्या पक्षाचा पराभव विनम्रपणे स्वीकारायला हवा”, असेही मत त्यांनी नोंदविले आहे. 

वाचा ः कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नव्हे! आरोग्यमंत्र्यांनी ‘मन की बात’ वरुन मुख्यमंत्र्यांना खडसावले

काॅंग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, “दुर्दैवाने सर्व राज्यांमधील आमची कामगिरी निराशाजनक आहे. हे अनपेक्षित आहे, असं म्हणावं लागेल. काॅंग्रेस वर्किंग कमिटी लवकर याची समिक्षा करणार आहे”, असे सांगत असताना ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन यांना शुभेच्छाही दिल्या. 

वाचा ः रेमडेसिवीरचा तुटवडा अन् आरोग्य क्षेत्रातील वास्तव

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काॅंग्रेसने विजय प्राप्त केला आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने काॅंग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस मतदारांना आपले मुद्दे समजून सांगण्यात कमी पडली. पश्चिम बंगालमध्ये काॅंग्रेसचा उमेदवारच निवडूण आला नाही. तृणमूल काॅंग्रेसने २१३ मतदारसंघात विजय प्राप्त केला, तर भाजपचे ७७ उमेदवार निवडूण आले आहेत.   

Back to top button