सिक्कीममध्ये पुन्हा प्रेमसिंग तमांग यांचे सरकार

Sikkim Assembly Election Result 2024
Sikkim Assembly Election Result 2024

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसह झालेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांच्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ३२ सदस्यांच्या सिक्कीम विधानसभेत एसकेएमने आतापर्यंत १९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एसकेएमला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) ने फक्त एक जागा जिंकली आहे.

सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) यांच्यात मुख्य लढत झाली. विधानसभेच्‍या ३२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी १७ विधानसभा जागांवर बहुमताचा आकडा पार केल्याने सत्ता कायम ठेवली आहे. एसकेएमने १८ जागा जिंकल्या असून १३ जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणी सुरू आहे. तर एसडीएफने एक जागा जिंकली असून एका जागेवर आघाडी आहे.

२०१९ च्या निवडणुकीत २४ वर्षांपासूनची एसडीएफची सत्ता संपुष्टात आली होती. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पराभव केला होता.

१९८४ पासून काँग्रेस सत्तेबाहेर

सिक्कीममध्ये १९८४ पासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. सिक्कीम राज्याच्या निर्मितीनंतर काँग्रेस फक्त दोनदा सत्तेवर येऊ शकली. १९७५ ते १९७९ आणि त्यानंतर बीबी गुरुंग हे १४ दिवस (११ मे १९८४ ते २५ मे १९८४ पर्यंत) मुख्यमंत्री होते. यानंतर काँग्रेसला सिक्कीममध्ये परतता आले नाही. येथे केवळ प्रादेशिक पक्षांचीच सत्ता आहे. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे पवन चामलिंग हे सर्वाधिक पाच वेळा (१९९४, १९९९, २००४, २००९ आणि २०१४) सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये प्रथमच सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली SDF चा पराभव केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news