आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी; उर्वरित कामे पावसाळापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी; उर्वरित कामे पावसाळापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील छोट्या व मोठ्या नाल्याच्या साफसफाई कामाची पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.1) केली. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.

या वेळी सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता रामदास तांबे, उपायुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सीताराम बहुरे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता एस. टी. जावरानी, सुनील बेळगावकर, राजेंद्र शिंदे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, कंचनकुमार इंदलकर, राजेश भाट व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील विविध भागातील नाल्यांची तसेच, पाणी साठणार्या ठिकाणांची पाहणी केली. चिंचवड येथील मिल्कमेड बेकरी, आकुर्डी रुग्णालय, बजाज कंपनी समोरील सबवे, निगडी उड्डाण पुल, माता अमृतानंदमयी शाळा, राधा स्वामी सत्संग भवन, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी उड्डाण पुल, धावडे वस्तीकडील उतार, पीसीएमची चौक, आदिनाथ नगर, आदिनाथ सोसायटीजवळील महामार्गाचा भाग येथील नाल्यांची तसेच, संभाव्य पाणी साठणार्या भागांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली.

पावसाळ्यामध्ये पूर स्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकार्यांना दिल्या. आरोग्य विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणार्या सर्व 144 नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news