तोंडात गळ अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान | पुढारी

तोंडात गळ अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

चर्‍होली येथे नदीवर मासेमारी करणार्‍यांच्या गळाला भारतीय कासव अडकले. गळ अडल्याने जखमी झालेल्या कासवास प्राणीमित्र संस्थेशी संपर्क करुन दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी कासवाच्या तोंडातील गळ सुखरुप काढून त्याला जीवदान दिले आहे.

मासे मारणार्‍या व्यक्तींनी लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्ट संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर सभासद विक्रम भोसले घटनस्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले, की गळ कासवाच्या शरीरात खोलवर रूतला आहे.

LPG cylinder price : मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

यांनतर कासवास तातडीने ताब्यात घेतले. वन विभागाशी चर्चा करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. गळ सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आले. 24 तास कासवाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

रशियन तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार युरोपीय संघ

कासवाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून त्यास वन विभागाचे अधिकारी अनिल राठोड, लक्ष्मण टिंगरे यांनी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

कासवाला अंधश्रद्धेपायी पाळले जाते. जसे पैशाचा पाऊस, काळाजादू, करणी यातून त्याची तस्करी केले जाते. तसेच, कासवाच्या पाठीपासून ढाल बनविली जाते म्हणूनदेखील कासवाला मारले जाते.
                                                                            -विक्रम भोसले, सभासद,                                                                    लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्ट

Back to top button