पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत झालायं असा बदल | पुढारी

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत झालायं असा बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मेट्रोच्या कामानिमित्त येरवडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या वेळी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन श्रीरामे यांनी केले आहे.

…असा आहे वाहतुकीत बदल

सिव्हील कोर्ट ते रामवाडी मेट्रोच्या रिच 3 या मार्गेकेवर एन. एम. चव्हाण चौक ते गोल्ड अ‍ॅडलॅब चौक दरम्यान महामेट्रो रेल्वेस्थानकाचे काम सुरू आहे. तसेच अ‍ॅडलॅब चौकात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 मे ते 26 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; दिवसभरात २ हजार ६८५ कोरोनाबाधितांची भर

  • पर्णकुटी चौकामध्ये मेट्रोच्या गर्डरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी दोन महिने 27 मे ते 26 जुलैदरम्यान वाहतुकीत बदल सुचित करण्यात आला आहे.
  •  सादलबाबा चौकाकडून येऊन पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाणार्‍या वाहतुकीस पर्णकुटी चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. ही वाहतूक सादलबाबा चौक-तारेश्वर चौक- पुढे गुंजन चौक येथे वळसा घेऊन पर्णकुटी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी मार्गस्त होईल.

समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणेचे पोपट : नाना पटोले

  • बिशप स्कूलकडून एन.एम चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड अ‍ॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक तीन येथून डावीकडे वळून एन. एम. चौकाकडे जाईल.
  • ए.बी.सी. चौकाकडून येणारी वाहतूक अ‍ॅडलॅब चौकातून सरळ रामवाडी अंडरपास या ठिकाणी जाईल.

Back to top button