देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; दिवसभरात २ हजार ६८५ कोरोनाबाधितांची भर | पुढारी

देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; दिवसभरात २ हजार ६८५ कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा देशात शुक्रवारी दिवसभरात २ हजार ६८५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, २ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शनिवारी देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ०.६०%, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.५४% नोंदवण्यात आला. देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ३०८ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ९ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुदैवाने ५ लाख २४ हजार ५७२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात गेल्या चार दिवसांपासून २ हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची भर पडत आहे. मंगळवारी २,२१४, बुधवार २,६२८, गुरूवार २,७१० तर शुक्रवारी २ हजार ८५ कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९३ कोटी १३ लाख ४१ हजार ९१८ कोरोना डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.३६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत.

तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटींहून अधिक बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १५ कोटी ७१ लाख ६४ हजार ७७५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ९३ लाख २४ हजार ८३३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ कोटी ४७ लाख ६३७ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती 

श्रेणी बूस्टर डोस

१) आरोग्य कर्मचारी ५१,९०,९७०
२) फ्रंटलाईन वर्कर्स ८६,१४,१०४
३) १८ मे ४४ वयोगट ७,५८,८२२
४) ४५ ते ५९ वयोगट १३,२५,०६४
५) ६० वर्षांहून अधिक १,८४,३६,८४९

हे ही वाचलंत का?  

Back to top button