समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणेचे पोपट : नाना पटोले | पुढारी

समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणेचे पोपट : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांमधील एक पोपट होता. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही हे पुढच्या काळात दिसून येईल. देशात फक्त धार्मिक मुद्यावर राजकारण सुरू आहे, अशी टीका करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वानखेडेंवर निशाणा साधला. नागपूर येथे आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

महागाईसारखे मुद्दे सोडून धार्मिक मुद्यावर राजकारण सुरू आहे. बेरोजगारी, महागाई यामधून जनता बाहेर निघत नसताना जनतेचे प्रश्न सोडून धर्माचे राजकारण सुरू आहे. धर्म, हनुमान चालिसा हा आस्थेचा विषय आहे, राजकारण कशासाठी? असा अप्रत्यक्ष टोलाही आज नागपूरमध्ये येणाऱ्या राणा दाम्पत्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ वर्षांमध्ये देश विकून देश चालवण्याच काम केले असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का ?

Back to top button