आ. लंके यांची जागा पवारांच्या मनात : मेहबूब शेख | पुढारी

आ. लंके यांची जागा पवारांच्या मनात : मेहबूब शेख

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

आमदार नीलेश लंके हे अशा ठिकाणी बसलेत की, ते ठिकाण 50 लाल दिव्यांपेक्षा पुढचे आहे. ते म्हणजे शरद पवार यांचे मन. त्यांच्या मनामध्ये माणूस बसायला वेळ लागतो. परंतु, आ.लंके त्यांनी ती जागा मिळविली. ते पवार यांच्या मनात बसले आहेत. पवार यांच्या मनात बसलेला माणूस कधी कुठे जाईल, हे सांगता येत नाही व डोक्यात बसलेल्या माणसाचं काय होईल, हे सांगता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीची युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख केले.

पारनेर येथे आनंद लॉनमध्ये शरद युवा संवाद यात्रेनिमित्त शेख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी सभापती गंगाराम बेलकर, शिक्षक नेते रा. या. औटी, युवती अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, तालुका अध्यक्षा सुवर्णा धाडगे, युवती तालुका अध्यक्ष पूनम मुंगशे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सादिक राजे, सचिन पठारे, अ‍ॅड राहुल झावरे आदी उपस्थित होते.

दौंडमध्ये बिबट्याची दहशत कायम; २४ बकऱ्या एका रात्रीत केल्या ठार

शेख म्हणाले, शरद पवार यांनी जातीयवाद कधीच केला नाही. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपची पिलावळ महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोंबा ठोकते. मात्र, 1992 ला या भाजपनेच कमंडल यात्रा काढत आरक्षणाला विरोध केला होता. ही भाजप नसून भारत जलाव पार्टी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष शेख, आमदार लंके यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

सुप्रिया सुळे या स्वतःच्या कर्तृत्वावर खासदार झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील हे लादलेले नेते आहेत, कोल्हापुरातून वाहून येत मेघाताई कुलकर्णी यांच्या जागेवर अतिक्रमण करून आमदार झालेले आहेत. स्वतःच्या मतदारसंघातून ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी टीका महेबूब शेख यांनी केली. आमदार नीलेश लंके हे अशा ठिकाणी बसलेत की, ते ठिकाण 50 लाल दिव्यांपेक्षा पुढचे आहे. ते म्हणजे शरद पवार यांचे मन. त्यांच्या मनामध्ये माणूस बसायला वेळ लागतो.

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक; जाणून घ्या पर्यायी मार्ग

परंतु, आ.लंके त्यांनी ती जागा मिळविली. ते पवार यांच्या मनात बसले आहेत. पवार यांच्या मनात बसलेला माणूस कधी कुठे जाईल, हे सांगता येत नाही व डोक्यात बसलेल्या माणसाचं काय होईल, हे सांगता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीची युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख केले. पारनेर येथे आनंद लॉनमध्ये शरद युवा संवाद यात्रेनिमित्त शेख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी सभापती गंगाराम बेलकर, शिक्षक नेते रा. या. औटी, युवती अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, तालुका अध्यक्षा सुवर्णा धाडगे, युवती तालुका अध्यक्ष पूनम मुंगशे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सादिक राजे, सचिन पठारे, अ‍ॅड राहुल झावरे आदी उपस्थित होते.

शेख म्हणाले, शरद पवार यांनी जातीयवाद कधीच केला नाही. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपची पिलावळ महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोंबा ठोकते. मात्र, 1992 ला या भाजपनेच कमंडल यात्रा काढत आरक्षणाला विरोध केला होता. ही भाजप नसून भारत जलाव पार्टी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष शेख, आमदार लंके यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

संभाजीराजेंची माघार! पडद्यामागे नेमके काय घडले?

सुप्रिया सुळे या स्वतःच्या कर्तृत्वावर खासदार झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील हे लादलेले नेते आहेत, कोल्हापुरातून वाहून येत मेघाताई कुलकर्णी यांच्या जागेवर अतिक्रमण करून आमदार झालेले आहेत. स्वतःच्या मतदारसंघातून ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी टीका महेबूब शेख यांनी केली.

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मेळावा

मेहबूब शेख यांच्याशी माझी वेगळी अटॅचमेंट आहे. पक्षासाठी पूर्ण वाहून घेतले, असा युवा नेता पाहिला नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे युवक राष्ट्रवादीकडे आकर्षित होतात. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी राज्यात झाला नसेल, असा मेळावा शेख यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये घेणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

अनुपस्थित पदाधिकार्‍यांचा समाचार

राष्ट्रवादीच्या तालुका कार्यकारिणीतील 14 पैकी फक्त चारच पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असल्याने महेबूब शेख यांनी युवक तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ज्यांना तुम्ही पदे दिली, त्यांना या पदाचे गांभीर्य आहे का? त्यांना बैठकीला येण्यास वेळ नसेल, तर ते लोकांसमोर काय जाणार, असा सवाल उपस्थित करत अनुपस्थित असलेल्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Menstrual Hygiene Day: २८ मे राेजीच का साजरा करतात मासिक पाळी स्वच्छता दिन? 

 

 

Back to top button