दौंडमध्ये बिबट्याची दहशत कायम; २४ बकऱ्या एका रात्रीत केल्या ठार | पुढारी

दौंडमध्ये बिबट्याची दहशत कायम; २४ बकऱ्या एका रात्रीत केल्या ठार

राहू : पुढारी वृत्तसेवा

दौंड तालुक्यातील दहिटणे येथे शुक्रवारी २८ मे रोजी यशवंत बोरकर यांच्या लहान अकरा बकऱ्या तर संपत सोमनाथ थोरात यांच्या 15 अशा २४ बकऱ्या बिबटयाने हल्ला करून ठार केल्या. एका छोट्या जाळीत या लहान बकऱ्या बंद केलेल्या असूनही बिबट्याने तेथे जाऊन त्या ठार केल्या.. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

परिसरातील विविध गावामध्ये बिबट्याचे दर्शन होत असताना वनविभाग कर्मचाऱ्यांच्या सुस्तीमुळे शेतकरी वर्गामधुन नाराजी व्यक्त होत आहे. मुळा-मुठा नदीकाठच्या कुरण भागातील घनदाट जंगलामध्ये बिबट्याला लपण्यासाठी भरपुर जागा आहे. तसेच याच भागात ऊसशेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्या सापड़त नाही

संभाजीराजेंची माघार! पडद्यामागे नेमके काय घडले?

या परिसरामध्ये बिबट्या सातत्याने दिसत असल्यामुळे बिबट्याला पकड़ण्याची मागणी सरपंच दादासो कोळपे, पिलानवाडी सरपंच वैशाली डुबे यांनी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राहू परीसरातील वाळकी, देवकरवाड़ी, टाकळी भिमा, पाटेठाण, वड़गाव बांड़े, दहीटणे, मिरवड़ी, पिलानवाड़ी, टेळेवाड़ी,पानवली आदी गावामध्ये सातत्याने बिबट्या दिसुन येत आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या आणि मेंढपाळाच्या शेळ्या, बकऱ्या, कुञी, रानजनावरे राञी-अपराञी फस्त केल्या आहेत.

या गावांमध्ये नागरिकांना बिबट्या राञी- अपराञी दिसल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वनविभागाचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने बिबट्या हल्ल्यात मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी देवकरवाडीचे सरपंच दिलीप देवकर यांनी केली आहे

हेही वाचा

नाशिक : जिल्हा परिषदेत आता एकच जलसंधारण कार्यालय

अजित दादांनी स्पष्टच सांगितलं, पीएमपीला पैसे देणार नाही !

मदतीचे आकडे कोटींचे, शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच !

Back to top button