आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन ‘रॉयल’ आज भिडणार | पुढारी

आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन ‘रॉयल’ आज भिडणार

अहमदाबाद; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 च्या विजेतेपदासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्स या संघाचा विरोधी संघ कोणता असणार याचे उत्तर आज मिळणार आहे. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला राजस्थान रॉयल्स आणि एलिमिनेटर सामन्यातील विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये आज, शुक्रवारी क्वालिफायर-2 चा सामना रंगणार आहे. या दोन संघांतील विजेता गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.

यंदाच्या आयपीएलची साखळी फेरी अतिशय रंगतदार झाली. राजस्थानने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर पाच विकेटस्ने विजय मिळवत गुणतक्त्यात थेट दुसर्‍या स्थानी झेप घेतली. त्यामुळे त्यांना क्वालिफायर-1 सामना खेळण्याची संधी मिळाली, पण तेथे त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावे लागले. तरीपण त्यांना अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी मिळाली असून त्यासाठी त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान पार करावे लागणार आहे. आयपीएलचा पहिला विजेता असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ या हंगामात नव्या रूपात समोर आला असून त्यांच्याकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत.

क्वालिफायर-2 लढत
राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
वेळ : सायं. 7.30 वा.पासून
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

Back to top button