पाणीटंचाई विरोधात तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा मोर्चा | पुढारी

पाणीटंचाई विरोधात तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा मोर्चा

पिंपरी-चिंचवड; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील तळेगाव स्टेशन परिसरात अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. याबबतचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना देण्यात आले.

तळेगाव स्टेशन परिसरात गेल्या महिनाभरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (गुरूवार) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोरात घोषणाबाजी करत मोर्चा नगरपरिषद कार्यालया समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक किशोर भेगडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा काळोखे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

Back to top button